Govt. English Medium Ashram School, Gadchiroli
Semana Bypass Road, Anandnagar, Gadchiroli Ta.Dist. Gadchiroli 442605
Monday, 21 November 2022
Friday, 19 November 2021
"सिकलसेल जनजागृती मिशन"
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत दि. 18-11-2021 रोजी शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा गडचिरोली ता. जि. गडचिरोली, येथे आरोग्य जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सिकलसेल आजार व आरोग्य पोषण या विषयावर विद्यार्थ्यांना माहितीपर शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरीता मार्गदर्शक म्हणून मा. फुलझेले मॅडम, सिकलसेल जिल्हा समन्वयक यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापीका कु. डी. एच. जुमणाके यांचे हस्ते आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
फुलझेले
मॅडम यांनी अत्यंत सोप्या भाषेत सिकलसेल आजाराबद्दल माहिती दिली. सिकलसेल हा आजार
असुन अलिंगी गुणसुत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. SS आणि AS या संकल्पना समजून सांगितल्या. हा आजार
अनुवंशिक असून लहानपणापासूनच या आजाराची लक्षणे (जसे रक्ताचे प्रमाण कमी होणे,
अशक्तपणा, वारंवार आजारीपण, पाठदुखी, छाती दुखणे Anemic) दिसुन
येत असल्यामुळे आपल्या शाळेतील सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांची योग्य काळजी घ्यावी
असे आवाहन अधिक्षक आणि अधिक्षिका यांना करण्यात आले. मुख्याध्यापीका कु. डी. एच.
जुमणाके यांनी देखील सिकलसेल आजाराबद्दल माहिती दिली. या आजारामुळे अनेक व्याधींना
आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणून या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी. ज्या
प्रदेशात मलेरियाची साथ अधिक तीव्र असते अशा प्रदेशात याचे रुग्ण अधिक आढळतात.
म्हणून आपण आपल्या गावी असताना योग्य काळजी घ्या असे विद्यार्थ्यांना प्रतिपादन
केले.
कार्यक्रमासाठी
सर्व शिक्षक, अधिक्षक, अधिक्षिका व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित
होते. व्यसन मुक्ती ची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*******
Friday, 28 February 2020
शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली येथे 10 वी च्या विद्यार्थ्यांचा “निरोप समारंभ”.
गडचिरोली : दि. 28/02/2020
स्थानिक शासकीय इंग्रजी
माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथे इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांकडुन 10 वी च्या
विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाचे अध्यक्ष एकलव्य पब्लीक
शाळेचे मुख्याध्यापक श्री. वरगंटीवार हे होते तर प्रमुख अतिथी शाळेची मुख्याध्यापीका
कु. डी. एच. जुमनाके, श्री. सुभाष लांडे, श्री. देवेंद्र वनकर (अधिक्षक) हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा
यांच्या प्रतीमेच्या पुजनाने झाली. सर्व 10 वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत
पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या
मनोगताने शाळेत घालवलेल्या दिवसांना उजाळा दिला. तसेच 10 वी च्या
विद्यार्थ्यांसाठी खेळांचे आयोजन करण्यात आलेले होते. इयत्ता 10 वी चा विद्यार्थी गौरव सिडाम याने गीत गायन केले. मार्गदर्शन
करतांना शाळेची मुख्याध्यापीका कु. डी. एच. जुमनाके यांनी विद्यार्थ्यांना भावी
आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री. वरगंटीवार सर यांनी
विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. गीता कुमरे हिने केले. कार्यक्रामाला वर्ग 9 वी चे वर्गशिक्षक श्री. विलास मडावी, श्री. रामदास पिलारे, श्री. गुलाब डोंगरवार, श्री. भुषण साठवणे, श्री. संदिप राठोड, श्री. आशिष नंदनवार, श्री. भूषण खोब्रागडे, श्री. राजहंस रामटेके, श्री. योगेश पाल, कु. एस. एन. झाडे (अधिक्षीका), कु. संगिता मोडक, कु. प्रियंका दुबे, कु. ज्योती जाधव, कु. प्रतिभा बनाईत, श्री. डी. जी. मरस्कोल्हे, श्री. लोमेश लोंडे तसेच 9 वी व 10 वी चे संपुर्ण विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
Sunday, 23 February 2020
शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली येथे “गाडगे महाराज जयंती” निमित्य शाळा परिसरात स्वच्छता अभियान.
गडचिरोली : दि. 23/02/2020
स्थानिक शासकीय
इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथे दिनांक 23 फेब्रुवारी
2020 रोज रविवरला गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात गाडगे महाराज
यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली. उपस्थित सर्व मान्यवरांनी
गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन केले. शाळेची मुख्याध्यापीका कु. डी. एच. जुमणाके यांनी गाडगे
महाराजांचे समाजसुधारक कार्य विषद केले तसेच स्वच्छतेचे विचार आचरणात आणावे असे आव्हान
केले.
गाडगे महाराज जयंती निमित्याने शाळा परिसरात “स्वच्छता अभियान” क्रीडा मार्गदर्शक श्री.
आशिष नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सर्व विद्यार्थी व
विद्यार्थीनींनी परिसरातील कचरा उचलुन कचराकुंडीमध्ये टाकुन परिसर स्वच्छ करण्यात
आला.
गाडगे महाराज जयंतीची कार्यक्रमाचे संचालन श्री.
संदिप राठोड यांनी केले तर आभार ------------- यांनी मानले. तसेच या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
Wednesday, 19 February 2020
शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली येथे “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” उत्साहात साजरी
गडचिरोली :
स्थानिक शासकीय
इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथे 19 फेब्रुवारी 2020 रोज बुधवारला छत्रपती शिवाजी महाराज
यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेची
मुख्याध्यापक कु. डी. एच. जुमणाके तर प्रमुख अतिथि म्हणुन मुख्याध्यापक श्री. डी.
डी. शेंडे हे होते.
कार्यक्रमाची सुरवात
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पुजनाने झाली. कु.
डी. एच. जुमणाके यांनी छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच मुख्याध्यापक श्री. डी. डी.
शेंडे यांनी शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य व व्यवस्थापन विषद केले
व शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावे असे आव्हान केले.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील कला शिक्षिका कु. विना धात्रक यांनी शिवाजी महाराजांवर गीत सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. जी. टी. डोंगरवार यांनी केले. तसेच
या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Friday, 4 December 2015
-
गडचिरोली : दि. 28/02/2020 स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली येथे इयत्ता 9 वी च्या विद्यार्थ्यांकडुन 10 वी च्...
-
गडचिरोली : स्थानिक शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा , गडचिरोली येथे 19 फेब्रुवारी 2020 रोज बुधवारला छत्रपती शिवाजी महाराज या...