Friday, 19 November 2021

 

"सिकलसेल जनजागृती मिशन"

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत दि. 18-11-2021 रोजी शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा गडचिरोली ता. जि. गडचिरोली, येथे आरोग्य जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना  सिकलसेल आजार व आरोग्य पोषण या विषयावर विद्यार्थ्यांना माहितीपर शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरीता मार्गदर्शक म्हणून मा. फुलझेले मॅडम, सिकलसेल जिल्हा समन्वयक यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापीका कु. डी. एच. जुमणाके यांचे हस्ते आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

            फुलझेले मॅडम यांनी अत्यंत सोप्या भाषेत सिकलसेल आजाराबद्दल माहिती दिली. सिकलसेल हा आजार असुन अलिंगी गुणसुत्रावरील अप्रभावी जनुकामुळे हा आजार होतो. SS आणि AS या संकल्पना समजून सांगितल्या. हा आजार अनुवंशिक असून लहानपणापासूनच या आजाराची लक्षणे (जसे रक्ताचे प्रमाण कमी होणे, अशक्तपणा, वारंवार आजारीपण, पाठदुखी, छाती दुखणे Anemic) दिसुन येत असल्यामुळे आपल्या शाळेतील सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन अधिक्षक आणि अधिक्षिका यांना करण्यात आले. मुख्याध्यापीका कु. डी. एच. जुमणाके यांनी देखील सिकलसेल आजाराबद्दल माहिती दिली. या आजारामुळे अनेक व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणून या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी. ज्या प्रदेशात मलेरियाची साथ अधिक तीव्र असते अशा प्रदेशात याचे रुग्ण अधिक आढळतात. म्हणून आपण आपल्या गावी असताना योग्य काळजी घ्या असे विद्यार्थ्यांना प्रतिपादन केले.

            कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, अधिक्षक, अधिक्षिका व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. व्यसन मुक्ती ची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

*******